Tuesday, March 23, 2010

माळरान

सुंदर बोलाल सुंदर मी , ओसाड बोलाल ओसाड मी ,
आनंदाचा सागर मी , दु:खांचा पर्वत मी ,
जोडीस माझ्या मऊ-लुसलुशीत ते गवत , " तुला सोडुनी जावे " असे नाही कुणी म्हणवत,
पावसाळयात फेडतो नजरेचे मी पारणे , माझ्याकडे होते जनावरांचे चरणे
जलधारांच्या शिंतोडयाने जातो मी फुलत , फिरण्यासाठी येई बालगोपाल झुलत ,
गुलाबी थंडीत मी धुक्यात हरवितो , सोनेरी किरणामुळे स्व:ताला सावरतो ,
दवाने जातो मी भिजुन-न्हावुन , वाटते असे की जिंकले मी जीवन ,
उन्हाळ्यात सोडिते साथ हिरवेपण , दगड-गोट्यासोबत राहते ते कड़वेपण ,
एकट्याने दगदग ही सोसवत नाही , आकाशातील ढग हा फसवत राही,
हाकेने कोकीळेच्या मन हे हसले , मृगराजाच्या स्वागतास अश्रु मी पुसले

प्रविण निकम

No comments:

Post a Comment